अवयवदानाच्या जनजागृतीसाठी चार युवकांची शनिवारवाडा ते आनंदवन ‘सायकलवारी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:41 PM2018-11-16T13:41:38+5:302018-11-16T13:42:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ) - अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चार ध्येयवेड्या युवकांनी शनिवारवाडा, पुणे ते आनंदवन, ...

Four youths do cycle rally for awairness about organ donation | अवयवदानाच्या जनजागृतीसाठी चार युवकांची शनिवारवाडा ते आनंदवन ‘सायकलवारी’ !

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी चार युवकांची शनिवारवाडा ते आनंदवन ‘सायकलवारी’ !

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) - अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने चार ध्येयवेड्या युवकांनी शनिवारवाडा, पुणे ते आनंदवन, वरोरा असा सायकल प्रवास सुरू केला आहे. या सायकलस्वारांचे भर जहॉगीर येथे १५ नोव्हेंबर रोजी सहानुभूती क्लबने स्वागत केले.
मृत्यूनंतरच्या अवयवदानाने  इतरांना जीवदान मिळू शकते. अवयदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून किसन ताकतोडे (अहमदनगर), राजेंद्र सोनुवणे (सोलापुर), सुरज कदम (नाशिक) आणि गणेश नरसाळे (सातारा) हे चार युवक गतवर्षापासून दिवाळीदरम्यान पुणे येथील शनिवारवाडा ते आनंदवन वरोरा, असा सायकलद्वारे प्रवास करतात. एरव्ही दिवाळीचा सण म्हटला की सर्वजण कुटुंबात दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देतात. या युवकांनी अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या कामी दिवाळीदरम्यानच्या सुट्ट्या सत्कार्मी लावल्या आहेत. दररोज सायकलद्वारे सुमारे शंभर किलोमिटरचा प्रवास करीत मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे आवाहन ते करीत आहेत. रिसोड तालुक्यातील भर जहॉगीर येथे या सायकलस्वारांचे आगमन होताच सहानुभूती फ्रेंन्डस क्लबच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी समाधान सानप, प्रदिप गरकळ, महादेव घुगे, गोपाल थोरात, डॉ.प्रल्हाद कोकाटे, रमेश सरदार, भानुदास गीते, सुभाष जोगदंड, गोपीनाथ मुंढे, प्र्रा.विजय सोनुने, भगवान पुरी, ज्ञानेश्वर तायडे, सचित काळदाते, सिताराम आढाव, अनिल नागरे, रायाजी काळदाते, संतोष महाराज गिरी, महादेव काळदाते, विलास तायडे, रमेश जायभाये, प्रदिप भालेकर, अजय चोपडे, भानुदास कोकाटे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Four youths do cycle rally for awairness about organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.