पोलीस, होमगार्ड बांधवांची मोफत रक्त तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:47+5:302021-01-08T06:10:47+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे व होमगार्ड बांधवांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या जिवाची पर्वा न ...
कोरोना संसर्ग रोखण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचे व होमगार्ड बांधवांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता पोलीस प्रशासनातील कर्मचारी व त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड बांधव यांचे मानोरा नगरवासीयांकडून आभार मानण्याच्या हेतूने स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान मानोरा व ग्रामीण रुग्णालय मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये एलएफटी, केएफटी, लिपिड प्रोफाइल व थायरॉइड संबंधित रक्त तपासण्या करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव खडसे, डॉ. महेश राठोड, आयुष्य विभागाचे डॉ. ललित हेडा, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे, सविता वड्डे तथा स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक चव्हाण व प्रहार सेवक नितेश लवटे उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमात अभिषेक चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानची रूपरेषा व उद्दिष्ट सांगितले. त्यानंतर झालेल्या शिबिरामध्ये ४५ पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची तपासणी करण्यात आली. काही पोलीस व होमगार्ड बांधव हे ग्रा.पं. निवडणुकीमुळे कर्तव्यावर असल्या कारणाने त्यांची तपासणी पुढच्या आठवड्यात ठेवण्यात आलेली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राम ढाकुलकर, प्रणव माहुरकर, प्रफुल्ल पद्मगिरवार, संदीप कटकतलवारे, करण ठाकूर, सौरभ राठोड, गोपाल कडवे, प्रणव कावरे, तन्मय पाटील, विनोद सुरजुसे यांनी परिश्रम घेतले.