४८ गावांतील गरोदर, स्तनदा मातांची मोफत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:36+5:302021-01-08T06:10:36+5:30

या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सुविधा मिळत आहे. तरी संबंधित गावातील रुग्णांनी या सुविधेचा फायदा घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग, ...

Free check up of pregnant and lactating mothers in 48 villages | ४८ गावांतील गरोदर, स्तनदा मातांची मोफत तपासणी

४८ गावांतील गरोदर, स्तनदा मातांची मोफत तपासणी

Next

या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सुविधा मिळत आहे. तरी संबंधित गावातील रुग्णांनी या सुविधेचा फायदा घेण्याचे आवाहन आरोग्य विभाग, जि. प. वाशिम व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान वाशिमच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत ४८ गावांपैकी अनेक गावांत तपासणी करण्यात आली असून, या फिरत्या वैद्यकीय पथकाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. ५ जानेवारीला कारंजा तालुक्यातील पानगव्हाण, ८ जानेवारीला कारंजा तालुक्यातील चाकोली, धोडप खु, ९ जानेवारीला कारंजा तालुक्यातील तांदूळवाडी, भापूर, १० जानेवारीला कारंजा तालुक्यातील जवळा, कुऱ्हा, ११ जानेवारीला कारंजा तालुक्यातील पार्डीतिखे, हिवरापेन, १२ जानेवारीला कारंजा तालुक्यातील पेडगाव, रिसोड तालुक्यातील खडकी ढंगारे, दापुरी वसान, १४ जानेवारीला रिसोड तालुक्यातील खैरखेडा, भामटवाडी, १५ जानेवारीला रिसोड तालुक्यातील कुत्तरडोह, वाडी रामराव, पिंपळशेंडा, १६ जानेवारीला रिसोड तालुक्यातील धरमवाडी, मालेगाव तालुक्यातील वरदरी, १८ जानेवारीला वाशीम तालुक्यातील फाळेगाव, दगडउमरा, १९ जानेवारीला वाशीम तालुक्यातील जांभरून महाली असा असल्याचे समन्वयक अमोल देशमुख यांनी कळविले आहे.

Web Title: Free check up of pregnant and lactating mothers in 48 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.