युवकांना मिळणार मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:33 PM2018-07-06T15:33:19+5:302018-07-06T15:35:34+5:30
वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवक, युवतींना मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अंंतर्गत शारीरिक चाचणी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वाशिम येथील पोलीस परेड मैदान येथे होणार असून, इच्छुक युवक-युवतींनी आवश्यक कागदपात्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ ते २५ वयोगटातील किमान १२ वी उत्तीर्ण युवक-युवतींना या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. ७८ सें.मी. ते ८३ सें.मी छाती व किमान १६५ सें.मी. छाती असलेले पुरुष उमेदवार आणि किमान १५५ सें.मी उंची असलेल्या महिला उमेदवार यांनी गुणपत्रिका, रहिवाशी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र, २ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांसह शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहावे. हे प्रशिक्षण अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी सुविधा शासनातर्फे मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे माया केदार यांनी सांगितले.