दीड लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तके
By admin | Published: June 19, 2014 11:58 PM2014-06-19T23:58:33+5:302014-06-20T00:14:11+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचली पुस्तके
वाशिम : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या मोफत पाठयपुस्तक वाटप योजने अंतर्गत सन २0१४-१५ मध्ये जिल्हयातील पहिल्या ते आठव्या वर्गातील मराठी, हिंदी व उर्दू माध्यमांच्या एक लाख ५८ हजार १३७ विद्यार्थ्यांना १0 लाख ७0 हजार ५५६ मोफत पाठयपुस्तकांचे वितरण केले जाणार हे वितरण जिल्हयात सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी २६ जून रोजी केले जाणार असून जिल्हयातील प्रत्येक शाळेत वितरीत करण्यासाठी पाठयपुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या या योजने अंतर्गत पहिल्या ते आठव्या वर्गातील अनु जाती, अनु जमाती, व इतर मागास वर्गीया सह सर्व जाती, अनुसुचित जमाती व इतर मागासवर्गा सह सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पाठयपुस्तके मोफत दिली जातात. या योजनेचा लाभ जिल्हयातील पहिल्या वर्गातील १८,३३३ विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यात येणार आहे. तसेच दुसर्या वर्गातील १८.६१, तिसरीतील १८५९७, चवथ्या वर्गातील १९,१२५, पाचव्या वर्गातील २0२७१, सहाव्या वर्गातील २११८0, सातव्या वगा्रतील २१७३६, व आठव्या वर्गातील २0,८३४ अशा एकूण एक लाख ५८ हजार १३७ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अनुसुचित जातीच्या १७0९६ विद्यार्थ्यांनी तर १७८२९ विद्यार्थ्यांचा, अनुसुचित जमाती मधील ६,८0७ विद्यार्थीनी व ७३0८ विद्यार्थ्यांचा आणि उर्वरीत सर्व प्रगर्वातील ५३,७८४ विद्यार्थीनी व ५३३१३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.