शेलुबाजार परिसरात मोफत रेती मिळालीच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:01+5:302021-04-18T04:40:01+5:30
दारिद्र्यरेषेखालील तसेच पक्के घर नसणारे, आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थिंना विविध योजनेंतर्गतच्या घरकुलाचा लाभ दिला जातो. लाभार्थिंना दिलासा ...
दारिद्र्यरेषेखालील तसेच पक्के घर नसणारे, आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थिंना विविध योजनेंतर्गतच्या घरकुलाचा लाभ दिला जातो. लाभार्थिंना दिलासा म्हणून जानेवारी २०१९ मध्ये घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास मोफत रेती देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसे शासन आदेशही जानेवारी २०१९ मध्ये निघाले. अद्याप याचा लाभ शेलुबाजार परिसरातील घरकुल लाभार्थिंना मिळाला नाही. तर दुसरीकडे घरकुल योजनेंतर्गतचे अनुदान अनियमित आहे. रमाई आवास योजनेेंतर्गतचे अनुदान गत एका वर्षांपासून मिळाले नाही. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन घरकुलासाठी मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थिंनी शुक्रवारी केली. दोन वर्षांपूर्वी तहसीलस्तरावर पात्र लाभार्थिंकडून मोफत रेतीसाठी अर्जही मागविले. परंतु, शेलुबाजार परिसरातील एकाही लाभार्थिला अद्याप मोफत रेती मिळू शकली नाही.