बेरोजगारांना दिले जाणार स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:28+5:302021-06-18T04:28:28+5:30
सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. ...
सुशिक्षित बेरोजगार युवक - युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. शेळी, कुक्कुट, गाय, म्हैस व दूध व्यवसाय पालनाचे तंत्र प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन, रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्यांचे प्रकार, उद्योग सुरू करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शन, उद्योजकता विकास, उद्योगाच्या संधी, शासकीय योजना आदींबाबतची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी उत्तीर्ण असावा. त्याचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी २१ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी डी. एस. खंदारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी योगेश डफळे यांनी केले आहे.