यावर्डी येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:47 PM2018-04-19T13:47:38+5:302018-04-19T13:47:38+5:30

कारंजा : कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्था वाल्हई तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजनेअंतर्गत दहावीच्या ३० होतकरू विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत  पाठ्यपुस्तकाच्या संचांचे वितरण करण्यात आले.

Free textbook distributed to students at Yavar! | यावर्डी येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण !

यावर्डी येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण !

googlenewsNext
ठळक मुद्देसंस्थेचे संचालक प्रा. निर्मलसिंह ठाकूर यांनी क्रांतीज्योती पुस्तकपेढी योजनेचे उद्देश सांगितला. दहावीच्या ३० विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकाच्या संचाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कारंजा : कारंजा तालुक्यातील यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्था वाल्हई तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजनेअंतर्गत दहावीच्या ३० होतकरू विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत  पाठ्यपुस्तकाच्या संचांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रतिनिधी विठ्ठल जमाले, आदिवासी महिला बहुद्देशीय संस्थेचे संचालक प्रा. निर्मलसिंह ठाकूर, ब्रिटिश टेलिकॉम लंडनचे मॅनेजर केदार गावंडे, कारंजाचे दंतचिकित्सक डॉ. मनिष राऊत, विवेक पोहेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेचे संचालक प्रा. निर्मलसिंह ठाकूर यांनी क्रांतीज्योती पुस्तकपेढी योजनेचे उद्देश सांगितला.  शासनाचा कोणताही निधी न घेता ही संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून हे कार्य करीत आहे व यापुढेही करत राहणार असे आश्वासन दिले. केदार गावंडे म्हणाले की, आम्ही आज ज्या पदावर पोहचलो ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळेच म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप खूप शिकाव, मोठ व्हाव, हीच अपेक्षा आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेच्या सर्व संचालकांची आहे. यानंतर दहावीच्या ३० विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकाच्या संचाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक विजय भड म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पिढी योजनेअंतर्गत आमच्या विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संच उपलब्ध करून दिलेत या उपक्रमाचे कौतुक केले. सरपंच प्रतिनिधी विठ्ठल जमाले यांनी या योजनेला दहावीचे पाच संच देण्याच जाहीर केलं, त्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संचालन शाळेचे शिक्षक अनिल हजारे तर आभार राजेश शेंडकर यांनी मानले. यावेळी बहुसंख्य गांवकरी पालक व विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Free textbook distributed to students at Yavar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.