वाशिम जिल्हायातील आदिवासी प्रवर्गातील युवक-युवतींना मिळणार मोफत प्रशिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:45 PM2018-01-01T14:45:11+5:302018-01-01T14:48:41+5:30
वाशिम : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला तर्फे ‘न्युक्लिअस बजेट’ योजनेंतर्गत सन २०१७-१८ वर्षात आदिवासी प्रवर्गातील युवक-युवतींना विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.
वाशिम : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोला तर्फे ‘न्युक्लिअस बजेट’ योजनेंतर्गत सन २०१७-१८ वर्षात आदिवासी प्रवर्गातील युवक-युवतींना विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. यासाठी ८ जानेवारी २०१८ पर्यंत स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
वाशिम जिल्हायातील आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता, युवक युवतींना एमएस सीआयटी संगणकाचे प्रशिक्षण, इंग्रजी व मराठी टंकलेखन, रोजगारा उपलब्ध करुन देणेसाठी फ्लेक्स प्रिंटींग मशिनचे आॅपरेटर करण्याचे प्रशिक्षण, नळ फिटींग, युवतींना ब्युटीपार्लर किंवा ड्रेस डिझायनर कोर्स करीता प्रशिक्षण, युवकांना बॅगमेकींगचे प्रशिक्षण, फर्निचर बनविणे, लॅपटॉप दुरुस्ती, अग्निशामक चालविणे, केबल कनेक्शन, सिमेंट काँक्रीटपासून खिडकी दरवाजे व टाके कुंडी तयार करणे, एसी दुरुस्ती आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे. यासाठी इच्छूक शासनमान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पात्र संस्थांकडून सदर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
इच्छुक शासन मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थांनी आपले प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला न्यु. राधाकिसन प्लॉट, माहेश्वरी भवन जवळ, महसूल भवन, अकोला येथे ८ जानेवारी २०१८ पर्यंत सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे करण्यात आले.