विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:20+5:302021-08-19T04:45:20+5:30

................. रेती घाटांचे लिलाव रखडले वाशिम : रेतीघाटांचे लिलाव पाच वर्षांपासून झालेले नाहीत. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, ...

Frequent power outages | विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय

googlenewsNext

.................

रेती घाटांचे लिलाव रखडले

वाशिम : रेतीघाटांचे लिलाव पाच वर्षांपासून झालेले नाहीत. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे.

................

रस्ता दुरुस्तीकडे लक्ष पुरवा!

वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावरून आययूडीपी काॅलनीत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्ता दुुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

................

देयके अदा करण्याचे आवाहन

वाशिम : शहरातील घरगुती विद्युत ग्राहकांकडे लाखो रुपये थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.

.................

वाशिममध्ये प्लास्टिक बंदीचा फज्जा

वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, याकरिता मध्यंतरी दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर कारवाईत खंड पडल्यामुळे प्लास्टिक बंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे.

..............

कर्ज तत्काळ मंजूर करण्याचे आवाहन

वाशिम : मुख्यमंत्री रोजगार योजनेतून निर्धारित निकषांप्रमाणे पात्र लाभार्थींना विनाविलंब कर्ज मंजूर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले.

....................

‘फायर ऑडिट’ करण्याची मागणी

वाशिम : व्यापारी संकुलांमध्ये अग्नी अवरोधक यंत्र बसवून दरवर्षी ‘फायर ऑडिट’ व्हायला हवे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

................

जऊळका येथे रस्त्यांची दुरवस्था

वाशिम : गावातील अंतर्गत रस्ते आधीच खराब झाले होते. आता अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर चिखल साचून अधिकच दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

..............

बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी

वाशिम : एस. टी. महामंडळाच्या वाशिम, रिसोड आगारातील अकोला, शिरपूर मार्गावरच्या काही दैनंदिन बसफेऱ्या अनियमित आहेत. त्या नियमित सोडण्यात याव्यात, अशी मागणी आकाश कांबळे यांनी बुधवारी केली.

..................

रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी

वाशिम : मालेगाव तालुक्यात पटवारी, कृषी सहायक, सचिव यासारख्या महत्त्वाच्या पदांवर प्रभारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर गाव विकासाची भिस्त आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी राजाराम टोंचर यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

................

‘बेटी बचाओ...’ मोहिमेची जनजागृती आवश्यक

वाशिम : शासनाने स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी व्यापक जनजागृती व्हावी, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी बुधवारी केली.

.....................

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची अद्याप प्रतीक्षा

वाशिम : शासनाच्या विविध योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच आता दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

..................

ग्रामीण भागात सिलिंडरची बेकायदा वाहतूक

वाशिम : ज्वलनशील वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस-सिलिंडरची ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू पाहणारा हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

.................

आरोग्यविषयक योजनेची अंमलबजावणी व्हावी

वाशिम : गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, शासनाने अंमलात आणलेल्या आरोग्यविषयक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी उमेश कुटे यांनी केली.

...................

अवैध प्रवासी वाहतूक जोमात

वाशिम : वाशिम-अनसिंग, वाशिम-कनेरगाव मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

..............

उपकेंद्राची क्षमता वाढविण्याबाबत निवेदन

वाशिम : राजगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरून विजेची होणारी मागणी व पुरवठ्यातील असमतोल पाहता, वीज उपकेंद्राची क्षमता वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

.............

प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण रखडले

वाशिम : शहरातील प्रमुख चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. यासह वाहतुकीचाही बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण करून वाहतूक सुरळीत ठेवावी, अशी मागणी अनिल चव्हाण यांनी नगर परिषदेकडे बुधवारी केली.

Web Title: Frequent power outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.