कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी ‘ड्राय रन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 07:51 PM2021-01-07T19:51:27+5:302021-01-07T19:54:15+5:30

Coronavaccine dry run जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

Friday 'dry run' for corona vaccination | कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी ‘ड्राय रन’

कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी ‘ड्राय रन’

Next
ठळक मुद्देलसीकरणाची माहितीची नोंद कोवीन अ‍ॅपमध्ये करण्यात येईल.एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल.

कारंजा उपजिल्हा शेंदुरजना
वाशिम : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार शुक्रवार, ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ‘ड्राय रन’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस लवकरच येणार असून, त्याअनुषंगाने प्रशासनातर्फे पूर्ण नियोजन करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. क्षेत्रिय स्तरावर ‘कोवीन अ‍ॅप’ किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी यापूर्वी नागपूरसह अन्य काही जिल्हयात ‘ड्राय रन’ घेण्यात आला. आता वाशिम जिल्ह्यातही ८ जानेवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णायल वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा आणि शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर जवळपास २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अ‍ॅपवरील नोंदणी नुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अ‍ॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन अ‍ॅपमध्ये करण्यात येईल.
‘ड्राय रन’ मोहिमेत लाभार्थींवर लसीकरणाची रंगीत तालिम केली जाणार आहे. लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे.
 
 लसीकरण कार्यक्रम राबविताना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा आणि शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल.
डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Friday 'dry run' for corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.