मैत्रीपूर्ण लढत, पाठींबा नाट्याने बदलले समीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:42+5:302021-07-09T04:26:42+5:30
दीड वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत भर जहागीर जि.प. सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडी, काॅंग्रेस व जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनुक्रमे प्रथम, ...
दीड वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत भर जहागीर जि.प. सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडी, काॅंग्रेस व जिल्हा जनविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची मते मिळविली होती. वंचितच्या उमेदवाराचा दोन अंकी मतांनी विजय झाला, तर काॅंग्रेस उमेदवाराचा निसटता पराभव झाला. हाच तपशील पोटनिवडणूकीत विचारात घेतला जाणे आवश्यक होते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे; मात्र भर सर्कलमध्ये काॅंग्रेसने अचानक राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करून जिल्हा परिषदेची जागा राकाॅंच्या वाट्याला सोडली. विशेष म्हणजे मागील निवडणूकीत राष्ट्रवादीने ही जागा लढलेली नव्हती. दरम्यान, काँग्रेस, राकाॅंला शिवसेनेचा पाठींबा मिळण्याची शक्यता बळावलेली दिसत आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी केलेली युती मात्र मतदारांच्या पचणी पडत नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
..................
अपक्षांनीही कसली कंबर
भर जहागीर जि.प. सर्कलमध्ये निवडणूक लढून विजयी होण्याची मनिषा बाळगून असलेल्या अपक्ष उमेदवारांनीही कंसर कसली आहे. ते आपापल्या परीने मतदारांचे मनपरिपर्तन करताना दिसून येत आहेत.