जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Published: July 1, 2016 01:10 AM2016-07-01T01:10:38+5:302016-07-01T01:10:38+5:30

आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ चसहशम येथे भारिप तथा भारतीय बौद्धमहासभेचे आंदोलन.

Front of District Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next

वाशिम : दादर मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन २५ जून ला सकाळी ३ वाजता बुलडोजर लावून उध्वस्त केलेले असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे. याच भवन मधील बाबासाहेबांची बुद्ध भुषण प्रिटींग प्रेसची तोडफोड केली आहे हे करणार्‍या दोषीवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा व भारीप बहुजन महासंघच्यावतीने ३0 जुन ला मोर्चा काढण्यात आला होता तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारीपचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कालापाड व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत यांनी दिला आहे. यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून बी.एस.खंडारे , प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. हा मोर्चा वाशिम शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर सभेत रुपांतर झाले होते. जे.एस.शिंदे, राजाभाउ चव्हाण, मोहन महाराज राठोड, संध्यातरी पंडित डि.एस.कांबळे, एन.के. गायकवाड, रवि मोरे पाटील, केशव सभादिंडे, अँड. सांळुखे हरिशचंद्र पोफळे, भारत भगत, केशव सभादिंडे, किसन कांबळे, प्रा.पा.ड.जाधव, डॉ.तायडे, सुमन ताजने, नंदा वाघमारे, प्रमिला शेवाळे, सिंधुताई वानखडे, किसन कटके, शेषराव चव्हाण, राउल देव, मनवर, समाधान खडसे, प्रल्हाद खडसे, कैलास भगत, अनंत तायडे, नागोराव उचित, नारायण सरकटे, विचार व्यक्त केले. कैलास इंगळे, माणिकराव खडसे, प्रभाकर सरकटे, नंदकिशोर खैेरे, शालीग्राम चुगळे, इत्यादी हजारो आंबेडकरी जनता मोर्चामध्ये भरपावसामध्ये सहभागी झाली होती. विषेश म्हणजे समता सैनिक दलाचे ऑफीसर आश्‍विन खिल्लारे, गोपाल लबडे, अभिमान पंडित, छगत सरकटे, माधव गायकवाड, देवानंद वाकोडे, हे सैनिक प्रामुख्याने हजर होते.

Web Title: Front of District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.