वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुल धारकांचा मोर्चा

By admin | Published: March 27, 2017 01:26 PM2017-03-27T13:26:53+5:302017-03-27T13:26:53+5:30

डॉ. बाबासाहेब अांबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुलधारकांच्या मोर्चा काढण्यात आला.

Frontier Workers and Hiker Holders Front of District Collectorate | वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुल धारकांचा मोर्चा

वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुल धारकांचा मोर्चा

Next

वाशीम - बांधकाम कामगार व घरकुल मागणीधारक यांच्या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर बांधकाम कामगार व घरकुलधारकांच्या मोर्चा काढण्यात आला.
मोचार्चे नेतृत्व भाकपचे राज्य सहसचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, परभणीचे मजूर कामगार नेते कॉम्रेड राजन क्षिरसागर, भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड संजय मंडवधरे व असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शेख सईद शेख हमजा यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेचे वाशीम शहर व जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करा. व सर्व गरजवंत व खऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेमध्ये समाविष्ट करुन लाभ द्यावा, बाधीत कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. ज्यांच्या कुटुंबात जास्त व्यक्ती आहेत व ते कमी जागेत निर्वाह करतात त्यांना कुटुंब संख्येनुसार जागा व घरकुल मंजूर करावे. ग्रामीण भागातील वंचित व गरजवंत लोकांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. ज्यांना अजिबात घर नाही, जागा नाही अथवा कच्या घरात राहतात त्यांनाच प्रथम प्राधान्य देवून घरकुल द्यावे. गृहनिर्माणसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जाहिर करण्यात आलेला कर्जपुरवठा व व्याजातील सवलत याची वेगाने अंमलबजावणही करावी यासह अनेक मागण्यांसाठीसदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कामगार संघटनेचे वाशीम शहर अध्यक्ष उमेश बन्सोड, मानोरा तालुका अध्यक्ष अब्दुल सलाम, बागवानपुरा शाखा अध्यक्ष शेख युसुफ, हुजेफानगर शाखा अध्यक्ष महंमद शफी, मोहसिनखान जब्बारखान, राजनी चौक शाखा अध्यक्ष कैलास नवघरे, सोपान कांबळे, बाबाराव कांबळे, संजय बाजड, वैजनाथ खडसे, जगजीवन मनवर, जयराम गायकवाड, सतिश वैरागडे, किरण मनवर, संजय अंभोरे, रमेश मुंजे पाटील, गजानन कांबळे, भिमराव राठोड, युनुसखान पठाण, अमोल रसाळ हिवरा रोहीला, साबेरखान पठाण हिवरा नारायण धामणे, राजू भांडेकर, भारत पाईकराव, रमेश खिल्लारे, सुभाष भालेराव, मुरलीधर पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Frontier Workers and Hiker Holders Front of District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.