कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘फ्रंटलाईन वारियर्स’ दुर्लक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:34 AM2020-05-08T10:34:24+5:302020-05-08T10:34:29+5:30

कोरोनाविरूद्धच्या लढाईतील या ‘फ्रंटलाईन वारियर्स’च्या मुलभूत समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत काही शिक्षकांनी व्यक्त केली.

'Frontline Warriors' ignored in battle against Corona! | कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘फ्रंटलाईन वारियर्स’ दुर्लक्षित!

कोरोनाविरुद्धच्या लढाईतील ‘फ्रंटलाईन वारियर्स’ दुर्लक्षित!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनीही हिरीरीने सहभाग नोंदवून जबाबदारी स्विकारली; मात्र कोरोनाविरूद्धच्या लढाईतील या ‘फ्रंटलाईन वारियर्स’च्या मुलभूत समस्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत काही शिक्षकांनी व्यक्त केली.
सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने घरोघरी सर्वेक्षणाच्या कामांसोबतच चेकपोस्ट, स्वस्त धान्य दुकानांवर शिक्षकांच्या नेमणूका केल्या आहेत. नैतीक जबाबदारी म्हणून शिक्षक सकाळी ८ ते दुपारी ४, दुपारी ४ ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी ८ अशा तीन पाळ्यांमध्ये इमानेइतबारे कार्य देखील करित आहेत; मात्र चेकपोस्टवर पिण्याचे पाणी, सॅनिटायझर, प्राथमिक उपचार साहित्य आदी सुविधांची उणिव भासत आहे. दुसरीकडे मार्च महिन्याचा पगार २५ टक्के कपात करून विलंबाने ६ मे रोजी अदा करण्यात आला यामुळे शिक्षक बांधव मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. चालू महिन्यात रमजान ईद हा सर्वात मोठा सण असल्याने एप्रिलचा पगार ईदच्या पुर्वी देण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

‘क्वॉरंटीन’ नागरिकांची देखभाल, घरोघरी सर्वेक्षण
शिक्षकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर कार्यरत महिला शिक्षिकांवर शाळांमध्ये ‘क्वॉरंटीन’ करून ठेवल्या जाणाऱ्या नागरिकांची देखभाल, सर्वेक्षणाच्या कामास विशेष प्राधान्य दिले आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांची यादी तयार करून ती प्रशासनाकडे पाठविण्यात येत आहे. यापुढेही ही जबाबदारी नेटाने पार पाडू; मात्र उद्भवलेल्या समस्या किमान दुर व्हाव्या, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.


शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा
विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी बुधवारी शिक्षणाधिकाºयांची भेट घेऊन उद्भवलेल्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र आदिवासी शिक्षक परिषद संघटनेचे पदाधिकारी विजय मनवर, रा.सू. इंगळे, दत्तराव इढोळे, सुभाष गोटे, इरफान बेग मिर्झा, प्रशांत बिजवे, दिपक जावळे, गजानन गायकवाड, राजेश तायडे, संतोष आमले, श्रीकांत बोरचाटे, मिलिंद इंगळे, गजानन शेळके, विनोद डोंगरे आदी उपस्थित होते.

 

Web Title: 'Frontline Warriors' ignored in battle against Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.