वाशिम तालुका ‘खविसं’ने केला १.३८ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:28 PM2018-12-18T16:28:55+5:302018-12-18T16:29:56+5:30
वाशिम : वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने सन २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या ४८८ क्विंटल तूर आणि २५०९.२१ क्विंटल हरभरा या शेतमालाच्या एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ५८४ रुपये रक्कमेचा अपहार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाने सन २०१७-१८ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या ४८८ क्विंटल तूर आणि २५०९.२१ क्विंटल हरभरा या शेतमालाच्या एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ५८४ रुपये रक्कमेचा अपहार केला. सहायक निबंधकांच्या अशा आशयाच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांनी ‘खविसं’च्या अध्यक्षासह व्यवस्थापक आणि सर्व संचालकांविरूद्ध १७ डिसेंबरला रात्री उशिरा विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीकांत खाडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने संगणमत करून किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकºयांकडून खरेदी केलेली ४८८ क्विंटल तूर (किंमत २६ लाख ५९ हजार ६०० रुपये) आणि हरभरा २५०९.२१ क्विंटल हरभरा (किंमत १ करोड ११ लाख ६५ हजार ९८४ रुपये) अशा एकंदरित १ करोड ३८ लाख २५ हजार ९८४ रुपये रक्कमेचा अपहार करून शासन व शेतकºयांची फसवणूक केली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष वामनराव महाले, उपाध्यक्ष कुंडलिक मोहळे, व्यवस्थापक नारायण कडवे, संचालक केशवराव इंगोले, संतोष गंगावणे, रामदास सोळंके, लक्ष्मणराव इंगोले, कुसुमताई गोरे, केशराबाई आखंड, रामचंद्र राठोड, विनोद पट्टेबहादूर, गजानन ठाकरे, गजानन गोटे, पांडुरंग पांढरे, सुरेश राठोड, रुपेश वºहाडे यांच्यावर भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ३४, १२० ‘ब’ नुसार गुन्हे दाखल केले.