इंधन दरवाढीचा निषेध: नरेंद्र मोदींचे मुखवटे घालून पेट्रोल पंपावर वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:29 PM2018-02-01T18:29:33+5:302018-02-01T18:31:11+5:30
मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील पेट्रोल पंपांवर १ फेब्रुवारीला दुपारी १.०० वाजताच्या दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करीत इंधन दरवाढ व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला.

शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या या अभिनव आंदोलनात स्वाभिमानी शेतकरीसंघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले ायांच्यासह तालुकाअध्यक्ष रोहित माने, ओमप्रकाश गायकवाड, दत्ता इंगोले,उमेश आंधळे, रवि लहाने, यासिन पठाण, पवन बळी, अजय इंगोले, धनंजय काळे, अनिकेत जाधव, सुनील जोगदंड आदि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी दामोदर इंगोले म्हणाले २०१४ च्या निवडणुकी वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला आश्वासने दिली होती.त्याची पूर्तता केली नाही. डिझेल व पेट्रोलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी असताना देशात त्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. मोदी यांनी गोरगरीब, शेतकºयांना आश्वासनाची चॉकलेट दिली आहेत. त्याचाा निषेध म्हणून पेट्रोल पंपावर वाहनधारकांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.