इंधन दरवाढीने शेतीकामे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:38 AM2021-04-03T04:38:14+5:302021-04-03T04:38:14+5:30

इंधन दरवाढीचा शेती व्यवसायावर थेट परिणाम होत असून, शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत असल्याने मेटाकुटीस आलेला आहे. दोन महिन्यात ...

Fuel price hikes disrupt agriculture | इंधन दरवाढीने शेतीकामे विस्कळीत

इंधन दरवाढीने शेतीकामे विस्कळीत

Next

इंधन दरवाढीचा शेती व्यवसायावर थेट परिणाम होत असून, शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत असल्याने मेटाकुटीस आलेला आहे. दोन महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीने सामान्यांची परवड होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचा थेट परिणाम सर्वसामान्य वर्गासोबतच शेतकरी, लघु व्यावसायिकावर झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षीसुद्धा लॉकडाऊनच्या काळात सर्व काही ठप्प असताना इंधनाच्या दरात मात्र, अनेकदा वाढ झाली होती. इंधन दरवाढीचा बोजा तळातील माणसापासून कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनाच बसला आहे. शेतकामात ट्रॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेती व्यवसाय खर्चिक झाला आहे. खताच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने नांगरणी व वखरणीचे दरात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मापारी यांनी केली आहे.

Web Title: Fuel price hikes disrupt agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.