कारंजा तालुक्यात वृक्ष लागवडीचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:31 PM2019-09-06T15:31:31+5:302019-09-06T15:31:43+5:30

कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

Fulfillment of 70% objective of tree cultivation in Karanja taluka! | कारंजा तालुक्यात वृक्ष लागवडीचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण !

कारंजा तालुक्यात वृक्ष लागवडीचे ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड  (वाशिम) :  सन २०१६ पासून महाराष्ट्र शासनाच्यावतीने वृक्षलागवड कार्यक्रमाला विशेष महत्व देण्यात आले असून या अंतर्गत राज्याला ३३ कोटी वृक्षलागडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अनुषंगाने सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्ष्टि देण्यात आले असून ४ सप्टेंबरपर्यंत कारंजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.
 उद्दिष्ट पुर्तीसाठी ३ आठवडे एवढा अवधी शिल्लक असून तोपर्यंत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असा विश्वास वनविभागाच्यावतिने व्यक्त करण्यात आला. मागील काही दिवसांत राज्यातील वृक्षाचे प्रमाण कमी झाल्याने ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या जन्माला आली. यामुळे वातावरणात सतत बदल होत असून तापमानात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने राज्यात वृक्षलागवड कार्यक्रमाला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून घोषित केले. या कार्यक्रमा अंतर्गत राज्यात सन २०१६ मध्ये १ जुलै या एका दिवसात २ कोटी, सन २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै ते या काळात ४ कोटी, सन २०१८ मध्ये १ ते ३१ जुलै यादरम्यान १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली असून सन २०१९ साठी १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या काळात राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  या अनुषंगाने कारंजा वनपरीक्षेत्र. कार्यालय, समाजिक वनीकरण विभाग व इतर विभागाच्या वतीने कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून याकरिता वनविभागाच्या वतीने रोपवाटप करण्यात आले. १ जुलैपासून वृक्षलागवडीस प्रारंभ करण्यात आला. दरम्यान कारंजा वनपरीक्षेत्र कार्यालयाला १ लाख २७ हजार ४०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत सदर कार्यालयाच्या वतीने १०० टक्के उद्दिष्टपुर्ती झाली आहे. शिवाय सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनेही उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले आहे. परंतु तालुक्यातील इतर प्रशासकीय विभागाच्या वतीने मात्र अद्यापपर्यंत उद्दिष्टपुर्ती न करण्यात आल्याने उद्दिष्टपुर्तीचा आकडा ७० टक्क्यांवर थांबला आहे. पुढील तीन आठवड्यात अद्यापपर्यंत रोप न नेणाºया प्रशासकीय विभागाने कारंजा वनपर्यटन केंद्रातून रोपे नेउुन वृक्षलागवड करावी तसेच वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपुर्तीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद इढोळे यांनी केले आहे. 
 
सन २०१९-२० या वर्षाकरिता कारंजा तालुक्याला ५ लाख वृक्षलागवडीचे उद्ष्टि देण्यात आले आहे. आजपर्यंत तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून उर्वरित उद्दिष्टही लवकरच पूर्ण करण्यात येईल
- अरविंद इढोळे
वनपरिक्षेत्र अधिकारी, कारंजा

Web Title: Fulfillment of 70% objective of tree cultivation in Karanja taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.