तृतीयपंथीयांच्या मूलभूत अधिकारांचे होणार संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:09+5:302021-07-10T04:28:09+5:30
तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) हा समाजातील एक दुर्लक्षित घटक म्हणून ओळखला जातो. या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जात ...
तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) हा समाजातील एक दुर्लक्षित घटक म्हणून ओळखला जातो. या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जात असल्याची अनेक उदाहरणे सभोवताली घडलेली आहेत. यामुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. शासनामार्फत त्यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने या समाज घटकाची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या मुख्य विकास प्रवाहात आणले जावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी समाज कल्याण कार्यालयात येऊन नोंदणी करावी. नोंदणीकरिता सोबत आधार कार्ड अथवा पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड, रेशन कार्ड व पासपोर्ट साइज दोन फोटो आणावेत, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त केदार यांनी केले आहे.