सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या निधीची प्रतिक्षा संपुष्टात; जिल्हास्तरावर लवकरच मिळणार निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 04:46 PM2018-02-27T16:46:27+5:302018-02-27T16:46:27+5:30
वाशिम - सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा केंद्र व राज्य शासनाचा दुसºया टप्प्यातील जवळपास १९१.४२ कोटींचा निधी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यास २६ फेब्रुवारीला मान्यता दिली.
वाशिम - सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा केंद्र व राज्य शासनाचा दुसºया टप्प्यातील जवळपास १९१.४२ कोटींचा निधी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यास २६ फेब्रुवारीला मान्यता दिली. हा निधी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाकडे वितरीत केला जाणार असल्याने निधीची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.
दर्जेदार शिक्षणाला चालना देणे, मुलभूत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देणे, शालेय शिक्षण व्यवस्थापनात पंचायती राज संस्था, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समिती, पालक-शिक्षक संघटना, माता-शिक्षक संघटना, जमातींच्या स्वायत्त परिषदा यांना प्रभावीरित्या सहभागी करून घेण्याचा प्रयत्न तसेच विविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान राबविण्यात येत आहे. विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधी हिस्स्याचे प्रमाण ६०:४० असे आहे. टप्प्याटप्प्याने हा निधी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला प्राप्त होत असल्याने काही उपक्रम व कार्यक्रम ऊधारीवर राबवावे लागतात तर शाळांची बांधकामे, दुरूस्ती व अन्य कामे निधी प्राप्त झाल्यानंतर करावी लागतात. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील दुसºया टप्प्यातील निधीची प्रतिक्षा शिक्षण विभागाला होती. केंद्र शासनाने ७ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या आदेशान्वये केंद्र शासनाच्या हिस्स्याच्या दुसºया टप्प्याचा ११४.८५ कोटींचा निधी राज्याच्या एकत्रित निधीत जमा केला होता. राज्य शासनाच्या हिस्स्याचा ७६.५७ कोटी रुपये निधी आता उपलब्ध झाला असून, केंद्र व राज्य शासनाचा एकत्रित १९१.४२ कोटी रुपये निधी शालेय शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गतच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. या निधीतून विविध उपक्रम व कार्यक्रम, बांधकामे, सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, सहायक अनुदाने (वेतनेतर) आदींचा खर्च भागविला जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद स्तरावर आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्या-त्या जिल्ह्याच्या मागणी प्रस्तावानुसार निधीचे वितरण केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्याला आतापर्यंत जवळपास ६० टक्के निधी मिळाला असून, ४० टक्के निधीची प्रतीक्षा होती. आता दुसºया टप्प्यातील केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळाल्याने उर्वरीत ४० टक्के निधीही लवकरच मिळेल, अशी अपेक्षा वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व्यक्त केली.