रिसोड येथे निधी समर्पण, गृह संपर्क अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:49+5:302021-01-18T04:36:49+5:30
कार्यक्रमास प्राचार्य कल्याण महाराज जोशी, कृष्णा महाराज आसनकर, भगवानराव क्षीरसागर, गजानन लाटे, वसंतराव इरतकर, मदनसेठ बगडिया, प्रदीपराव देशमुख, किशोर ...
कार्यक्रमास प्राचार्य कल्याण महाराज जोशी, कृष्णा महाराज आसनकर, भगवानराव क्षीरसागर, गजानन लाटे, वसंतराव इरतकर, मदनसेठ बगडिया, प्रदीपराव देशमुख, किशोर महाजन, लक्ष्मणराव सरनाईक, अॅड. प्रशांत माझोडकर उपस्थित होते. भगवाध्वज, भारत माता व प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा पुजनानंतर आरती करण्यात आली. विजय इंगोले यांनी प्रास्ताविक केले. महंत शांतीपुरी महाराज म्हणाले की, प्रभू श्रीराम हे सर्वांनाच वंदनीय आहेत. अयोध्येय श्रीरामाचे मंदिर निर्माण व्हायला, सर्वांनीच हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मोरगव्हाण येथील परमानंद संभाजी कोकाटे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश समर्पण निधी म्हणून सुपूर्द केला; तर बबनराव चव्हाण पवारवाडी, प्राचार्य कल्याण महाराज जोशी, सिद्धेश्वर व्यायाम शाळा यांनीही आपापल्या परिने योगदान दिले. वाशिम येथील राजेश कराळे यांनी श्रीराम मंदिर समर्पण निधी व गृह संपर्क अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन स्वप्नील साकळे यांनी केले. याप्रसंगी शहर व तालुक्यातील श्रीराम भक्त व शहरातील व्यापारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)