साखरा आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री संजय राठोड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:18 PM2019-01-28T16:18:59+5:302019-01-28T16:19:24+5:30

वाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

Funds will not be reduced for School - Guardian Minister Sanjay Rathod | साखरा आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री संजय राठोड  

साखरा आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडणार नाही - पालकमंत्री संजय राठोड  

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारत उभारणी, शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती आणि शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सोमवारी शाळेत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, नगराध्यक्ष अशोक हेडा, शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, डी.ए. तुमराम, चंद्रकला इंगळे, उपसरपंच द्वारकाबाई राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले, दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शाळेमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध होणार आहे. राज्यात केवळ १२ आंतरराष्ट्रीय शाळांना मान्यता मिळाली असून त्यामध्ये साखरा येथील शाळेचा समावेश आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पाच हजार विद्यार्थी क्षमतेच्या या शाळेचे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. शाळेच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक राजूभाऊ महाले यांनी केले.

Web Title: Funds will not be reduced for School - Guardian Minister Sanjay Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.