मंगरुळपीरमध्ये आढळला फुरसे जातीचा सर्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 08:23 PM2017-08-11T20:23:37+5:302017-08-11T20:24:32+5:30
मंगरुळपीर: शहरातील राधाकृष्ण नगरी परिसरात गुरुवारी रात्री दुर्मिळ होत असलेला फुरसे जातीचा विषारी साप आढळून आला. वन्यजीव संरक्षक गौरव इंगळे यांनी हा साप पकडून त्याला जंगलात सोडून जीवदा दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: शहरातील राधाकृष्ण नगरी परिसरात गुरुवारी रात्री दुर्मिळ होत असलेला फुरसे जातीचा विषारी साप आढळून आला. वन्यजीव संरक्षक गौरव इंगळे यांनी हा साप पकडून त्याला जंगलात सोडून जीवदा दिले.
जगातील सर्वाधिक विषारी असलेल्या चार विषारी सर्पांपैकी एक असलेला फुरसे जातीचा विषारी साप गुरुवारी रात्री मंगळरु ळपीर शहरातील राधाकृष्ण नगरीतील रहिवासी शिंदे यांच्या घराशेजारी आढळून आला. वन्यजीव संरक्षक गौरव इंगळे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला पकडले आणि त्याला जंगलात सोडून जीवदान दिले. जवळपास दोन फुट लांबीचा हा साप मंगरुळपीर शहरात अनेक दिवसांनंतर आढळला आहे.