उमेदवारांचे भवितव्य आज होणार मशिनबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:56 AM2017-10-07T01:56:09+5:302017-10-07T01:56:56+5:30
मानोरा : मानोरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ४१ ग्राम पंचायतच्या निवणुका होत आहेत. त्यामध्ये हातना ग्राम पंचायत अविरोध झाल्याने ४0 ग्राम पंचायतची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी माजी सरपंच मतदाराच्या दारात जावून मतदान करण्याचे आवाहन करतांना दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

ग्रामपंचायतची निवडणुक प्रचार ात आपल्या गटाचा सरपंच व्हावा यासाठी गाव पुढार्यानी प्रतिष्ठापणाला लावल्याचे चित्र दिसून आले. गत पंचवार्षीकला सत्तेत असलेल्या गाव पुढार्याला मतदार आता विकासाबाबत प्रश्न विचारत आहे.
या वेळेस सरपंच थेट जनतेतुन असल्यामुळे अनेक दिग्गजांनी यावेळी सरपंच पदासाठी निवडणुक रिंगणात उडी घेतली खरी, पण मताचा जोगवा मागतांना कमालीची दमछाक झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी तिरंगी लढत असल्यामुळे निवडणुक कठीण झाली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी ते माघारी घेण्यापर्यंत उमेदवाराला मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे मतदारांच्या दारात जाण्यासाठी उमेदवाराला वेळ कमी पडल्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रचार झालेला दिसून आला. आ पली बाजु व्हाटसअपच्या माध्यमातुन मतदारापर्यंत अनेकांनी पोहचविले.
बाहेरील मतदान ठरणार निर्णायक
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला विजयी करण्यासाठी बाहेरील मतदान निर्णायक ठरणार आहे. अनेक गावातील शेकडो मतदार बाहेर गावी आहे. मतदार यादीत नावे जरी असली तरी ते अनेक वर्षापासून मुंबई ,पुणे येथे स्थायिक झाले आहे. त्याचा फायदा घेत बाहेरील मतदान त्याच्या नातेवाइकांच्या माध्यमातून आणण्याचे प्रयत्न चालू आहे, ते मतदान झाल्यास निर्णय ठरु शकते.