भावी शिक्षकांनी दिली पात्रता परीक्षा

By admin | Published: December 15, 2014 12:47 AM2014-12-15T00:47:26+5:302014-12-15T00:47:26+5:30

३१ परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा : पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात.

Future teachers give eligibility test | भावी शिक्षकांनी दिली पात्रता परीक्षा

भावी शिक्षकांनी दिली पात्रता परीक्षा

Next

वाशिम : गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून एकूण सात हजार ४७ परीक्षार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. १४ डिसेंबर रोजी वाशिम शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरून परीक्षा पार पडली. यावेळी सर्वच परिक्षा केंद्रावर पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. गतवर्षी १0 हजार ८00 परीक्षार्थींनी टीईटी परीक्षा दिली होती.
शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणार्‍या शिक्षण सेवक उमेदवाराला सीईटी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबर २0१४ रोजी वाशिम शहरातील ३१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी ३१ केंद्र संचालक, २३५ पर्यवेक्षक, ३१ सहायक पर्यवेक्षक तर पाच झोन ऑफिसर नियुक्त करण्यात आले होते. प्राथमिक शिक्षकांसाठी असणार्‍या पहिल्या पेपरसाठी ४६८३ परीक्षार्थी तर उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी असणार्‍या पेपर दोनसाठी २३६४ परीक्षार्थींची नोंद केली होती. पहिला पेपर सकाळी १0.३0 वाजता सुरू झाला.
दरम्यान सदर पेपर साठी सकाळी ९ वाजतापासून विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर उपस्थिती लावली होती. तर दुसर्‍या पेपरसाठीही सर्वच परिक्षा केंद्र दुपारी १ वाजताच्या सुमारासच हाऊसफुल्ल दिसून येत होते. परिक्षेदरम्यान शांतता व सुव्यवस्था ५ठेवण्यासाठी पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रावर शांततेत ही परीक्षा पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे ऐकीवात नाही.

Web Title: Future teachers give eligibility test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.