राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भवितव्य धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:41 PM2019-02-19T16:41:50+5:302019-02-19T16:41:57+5:30
शिरपूरजैन (वाशिम) : मालेगाववरून शिरपूरमार्गे रिसोड, शेनगाव, हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाचे निर्माण कार्य सद्या सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : मालेगाववरून शिरपूरमार्गे रिसोड, शेनगाव, हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाचे निर्माण कार्य सद्या सुरू आहे. मात्र, तयार झालेल्या रस्त्यावर अगदीच कमी प्रमाणात पाणी टाकले जात असल्याने रस्त्याचे भवितव्य धोक्यात सापडले आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लक्ष पुरविण्याची मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
शिरपूर परिसरातून जात असलेल्या ४६१ बी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सद्या चांगलीच गती प्राप्त झाली असून काही ठिकाणचे रस्ते देखील तयार झाले आहेत. सिमेंट-काँक्रीटच्या या रस्त्यांवर पुरेशा प्रमाणात पाणी टाकण्यात आले तरच रस्त्यांचे मजबूतीकरण शक्य आहे. मात्र, संबंधित यंत्रणेकडून नेमक्या याच महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्याचे भवितव्य धोक्यात सापडले आहे.