गाडगेबाबांच्या स्मृती जपतेय ‘वाटाणेवाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:59 PM2018-12-19T15:59:10+5:302018-12-19T16:00:01+5:30

वाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू  केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . 

Gadgebaba's memory nurtured in Watanewadi of washim district | गाडगेबाबांच्या स्मृती जपतेय ‘वाटाणेवाडी’

गाडगेबाबांच्या स्मृती जपतेय ‘वाटाणेवाडी’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विदर्भासह मराठवाडयात प्रसिध्द असलेली ‘वाटाणेवाडी’ वारकºयांचा विसावा ठरत आहे. वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा यांनी सुरू  केलेली पालखी विसाव्याची व्यवस्था आज वर्षानुवर्षांपासून अविरत सुरू ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे . 
दरवर्षी पंढरपूर, शेगावसह या रस्त्यावरुन कोणत्याही धार्मिक क्षेत्रावर जाणाºया अनेक पालख्यांमधील हजारो वारकºयांची सेवा करण्याचे कार्य वाटाणे परिवाराच्या या वाटाणेवाडीत होत आहे. 
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाºया २० पालख्या, श्री संत गजानन महाराज प्रगटदिनासाठी शेगाव येथे जाणाºया २५ पालख्या व माहूर, औढा नागनाथ, परळी वैजनाथसह इतर देवस्थानांवर जाणाºया २० पालख्यांमधील वारकरी तसेच ईतर ३० ते ४० पालख्या येथे विसावा घेऊन मगच पुढील मार्गक्रमण करतात. या मुक्कामाच्या काळात वाटाणेवाडीत त्यांच्या मुक्कामासह स्रान,चहा-पान, नाश्ता ,जेवण व इतर व्यवस्था वाटाणे परीवार कडून केल्या जाते. 
अकोला रोडस्थित असलेल्या वाटाणेवाडीत संत गाडगेबाबा एका पालखीसोबत वाशिम येथे आले होते.अकोला रस्त्यावर असलेल्या वाटाणेवाडीमध्ये जाऊन त्यांनी ‘तत्कालीन (आता स्व.) दौलतराव नारायणराव वाटाणे यांना हाक मारून ‘आम्ही पंढरपुरा चाललो आहे’ असे  सांगितले. त्यावेळी दौलतराव यांनी गाडगेबाबासह त्या पालखीत सहभागी असलेल्या वारकºयांची व्यवस्था केली. तेव्हा गाडगेबाबांनी ‘हे कार्य असेच सुरू  राहू दे ’असे म्हटले.तेव्हापासून दौलतराव यांच्यानंतर हा वसा दौलतराव नारायणराव वाटाणे यांचे चिरंजिव दिनकराव वाटाणे अविरत सुरु ठेवून गाडगेबाबांच्या स्मृती जपताहेत. आज मराठवाडयासह, विदर्भात अकोला रस्त्यावरील वाटाणेवाडी ‘वारकºयांचा विसावा’ म्हणून ओळखली जात आहे.

Web Title: Gadgebaba's memory nurtured in Watanewadi of washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.