रिसोडच्या ‘सिटी केअर’ला गडकरींकडून व्हेंटिलेटरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:17+5:302021-05-22T04:37:17+5:30

सिटी केअर कोविड हॅस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अजय पाटील यांनी १८ मे रोजी माजी आमदार जाधव यांचा संदर्भ देऊन ...

Gadkari donates ventilator to Risod's City Care | रिसोडच्या ‘सिटी केअर’ला गडकरींकडून व्हेंटिलेटरची भेट

रिसोडच्या ‘सिटी केअर’ला गडकरींकडून व्हेंटिलेटरची भेट

Next

सिटी केअर कोविड हॅस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अजय पाटील यांनी १८ मे रोजी माजी आमदार जाधव यांचा संदर्भ देऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र पाठविले. त्यात त्यांनी हस्पिटलसाठी व्हेंटिलेटरची मागणी केली होती. मंत्री गडकरी यांनीही तत्काळ ही मागणी मान्य करून आमदार जाधव यांच्याकडे व्हेंटिलेटर पाठवून ते रिसोडला पोहचवून देण्याची जबाबदारी सोपविली. त्यानुसार, २० मे रोजी जाधव यांनी रिसोडला जावून सदर व्हेंटिलेटर हॉस्पिटलकडे सुपूर्द केले. यावेळी डॉ अजय पाटील, डॉ रवि वोरा, डॉ अनिल तापडिया, डॉ जितेंद्र शिंदे, डॉ महेंद्र बबेरवाल यांच्यासह डॉ विजयप्रसाद तिवारी, नारायण सानप, विठ्ठलराव आरु, सूर्यप्रकाश दहात्रे, प्रदीप देशमुख, प्रणव बोलवार, दीपक सोनुने, डॉ शिंदे, डॉ खोडके, गोपाल जाधव, डिगंबर जाधव, सुनील धुत, श्रीकांत संत उपस्थित होते.

Web Title: Gadkari donates ventilator to Risod's City Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.