गजानन महाराज पालखीचे शिरपुरातून प्रस्थान

By Admin | Published: June 8, 2017 03:40 PM2017-06-08T15:40:29+5:302017-06-08T15:40:29+5:30

संत गजानन महाराज यांची पालखी रात्रीच्या मुक्कामानंतर ८ जून रोजी सकाळी पुढील प्रवासाठी रवाना झाली.

Gajanan Maharaj departed from Palkhi's Shirpur | गजानन महाराज पालखीचे शिरपुरातून प्रस्थान

गजानन महाराज पालखीचे शिरपुरातून प्रस्थान

googlenewsNext

शिरपूर जैन : ह्यगण गण गणात बोतेह्ण , ह्यगजानन महाराज की जय जयकार करीत शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांची पालखीचे रात्रीच्या मुक्कामानंतर ८ जून रोजी सकाळी पुढील प्रवासाठी रवाना झाली. यावेळी शिरपुरवासियांनी भावपूर्ण निरोप दिला. गजानन महाराज संस्थान शेगावची पालखी ७ जून रोजी शिरपुर नगरीत दाखल झाली होती. आषाढी उत्सवासाठी संत गजानन महाराजांची निघालेली पालखी सोहळयाच्या दर्शनाचा पंचक्रोशितील शेकडो भाविकांनी लाभ घेतला. ७ जून रोजी येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये मुक्कामी पालखीच्या दर्शनाकरिता भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पालखीतील वारकऱ्यांनी प्रवचन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रम घेतले. शिरपुरातून पालखीचे प्रस्थान होत असतांना शिरपुरवासियांनी भावपूर्ण निरोप दिला. यावेळी पालखी मार्गात मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी बसस्थानक चौक व कोंडबातातया ढवळे विद्यालयालगत भाविकांच्यावतिने चहा, दुधा, नाश्ताची व्रूवस्था करण्यात आली होती. तसेच रिसोड फाटा, स्व. पुंडलीकराव गवळी महाविद्यालयाजवळ , संभाजी नवयुवक मंडहाच्यावतिने सुध्दा अल्पोपहार, साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. तर आरोग्य केंद्रासमोर सुकामेवाचे पाकीट वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. अरिहंत विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांवर फुलांच्या पाकळया उधळून त्यांचे स्वागत केले.  पालखी वसारी येथे पोहचल्यानंतर ग्रामस्थांच्यावतिने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Web Title: Gajanan Maharaj departed from Palkhi's Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.