श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावात पालखी सोहळा; चौकाचौकात रांगोळ्या काढून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:13 PM2018-02-06T13:13:18+5:302018-02-06T13:14:51+5:30

मालेगाव:  श्री संत गजाननमहाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावातील मालेगाव वाशिम राज्यमहामार्गावरील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात पालखी सोहळा पार पडला .

Gajanan Maharaj Palkhi ceremony in Malegaon | श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावात पालखी सोहळा; चौकाचौकात रांगोळ्या काढून स्वागत

श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावात पालखी सोहळा; चौकाचौकात रांगोळ्या काढून स्वागत

Next
ठळक मुद्देसंत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात पालखी सोहळा पार पडला .  मालेगावातील दुर्गा चौकातून पालखी सोहळ्यास सकाळी १०.०० वाजता सुरुवात झाली .पालखी सोहळ्यात ६ घोडे, शेकडो वारकरी  सहभागी झाले होते.

मालेगाव:  श्री संत गजाननमहाराज प्रगटदिनानिमित्त मालेगावातील मालेगाव वाशिम राज्यमहामार्गावरील श्री संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त ६ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात पालखी सोहळा पार पडला . उदया ७ फेब्रुवारी रोजी  महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे . त्याचा लाभ  ३५ हजार भाविक घेणार आहेत . ७५ क्विंटलचा महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे . पालखी रस्त्यावर जागोजागी रांगोळया काढून पालखीचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. 

                 मालेगावातील दुर्गा चौकातून पालखी सोहळ्यास सकाळी १०.०० वाजता सुरुवात झाली .सर्वात समोर अश्वारूढ वारकरी, त्यांच्या मागे बँड त्यामागे भजनीमंडळ होते .त्यानंतर असलेल्या पालखीत श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती होती . त्यामागे मंगल कलश ,व वृंदावन घेतलेल्या महिला होत्या .त्यामागे सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये श्री संत गजानन महाराज यांची प्रतिमा  होती . रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविक श्री चे दर्शन घेत होते .पालखी सोहळ्यात ६ घोडे, शेकडो वारकरी  सहभागी झाले होते. पालखी संत गजानन महाराज मंदिरात पोहोचली तिथे  सोहळ्याची सांगता झाली.        महाप्रसाद वितरण ७ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी ११.०० वाजता पासुन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे . महाप्रसादासाठी  ५ क्विंटल शेव ,४१  क्विंटल पीठ ,१०  क्विंटल ची भाजी,  ७ क्विंटल बुंदी, १२ क्विंटल भात राहणार आहे .

Web Title: Gajanan Maharaj Palkhi ceremony in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.