सावरगाव येथील अतिक्रमित जमिनीवर वनविभागाने चालविला गजराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:29+5:302021-06-18T04:28:29+5:30
मानोरा तालुक्यामध्ये हजारो हेक्टर वनजमीन असून या वनजमिनीवर मोजकीच झाडे दृष्टिपथास पडतात. केंद्र आणि राज्य शासन वृक्षारोपण आणि ...
मानोरा तालुक्यामध्ये हजारो हेक्टर वनजमीन असून या वनजमिनीवर मोजकीच झाडे दृष्टिपथास पडतात. केंद्र आणि राज्य शासन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी असंख्य योजना राबवीत आहेत. त्याचप्रमाणे खासगी व्यवस्थापनसुद्धा वनांचा टक्का वाढावा यासाठी तालुक्यामध्ये आपापल्या परीने प्रयत्न करीत असताना वन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी मागील काही वर्षापासून वनजमिनीवर बेकायदेशीर कब्जाही मिळविलेला आहे. तालुक्यातील मानोरा-कारंजा रस्त्यावरील सावरगाव फॉरेस्ट येथील विस्तीर्ण वनजमीन सात ते आठ लोकांनी अवैधरीत्या मागील काही वर्षांपासून ताब्यात घेतलेली होती. सावरगाव फॉरेस्ट बीटमध्ये कर्तव्याला असलेल्या वनरक्षक सपना राठोड यांनी वरिष्ठांना कळवून आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार गुरुवारी वन प्रशासनातील वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड, इतर वन कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत सावरगाव बीटमधील हे अतिक्रमण काढण्याची धाडसी कारवाई केली.