वाशिम येथील तारांगण बंदच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:16 AM2021-02-18T05:16:41+5:302021-02-18T05:16:41+5:30
००००००० ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे समोर येत ...
०००००००
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे समोर येत आहे. शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी जलस्त्रोत, जलकुंभातील पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करण्याच्या सूचना जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने बुधवारी दिल्या.
००००००००
विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची धास्ती
वाशिम : सध्या कोरोनाचा आलेख उंचावत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये कोरोना विषयक भीतीचे वातावरण असल्याचे उपस्थितीवरून दिसून येते. गत तीन दिवसांत विद्यार्थी उपस्थिती कमी झाली आहे.
०००००००००००००
समृद्ध गाव स्पर्धेतंर्गत प्रशिक्षण
वाशिम : अधिकाधिक गावे सुजलाम, सुफलाम करण्यासाठी जिल्ह्यातील गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने ग्रामस्थांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती या अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी बुधवारी दिली.
००००
मधुमक्षिका पालनाबाबत मार्गदर्शन
वाशिम : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्र्य रेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. महिलांनी मधुमक्षिका पालनाकडे वळावे, याबाबत कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.