Ganesh Festival : गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:06 PM2018-09-16T15:06:53+5:302018-09-16T15:07:12+5:30
वाशीम : वाशिम : स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बालगणेश मंडळाने गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून, त्याअनुषंगाने अंमलबजावणी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशीम : वाशिम : स्थानिक लाखाळा परिसरातील जानकीनगर बालगणेश मंडळाने गणेशोत्सवादरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून, त्याअनुषंगाने अंमलबजावणी सुरू आहे.
यावर्षी शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, पर्यावरण, बेटी बचाव, नेत्रदान आदी विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात महिला व बालकांनी पुढाकार घेतला आहे. महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंडपामध्ये प्रत्येकाला आई पाहीजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, मग मुलगी का नाही, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, बेटी है तो कल है, पर्यावरणाचा संदेश देत झाडे लावा झाडे जगवा, शेतकरी राजा धीर धर, संकटावर मात कर, आत्महत्या करु नको यासोबतच रक्तदान, नेत्रदान बाबत बॅनर लावून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबीर, व्यसनमुक्ती कार्यशाळा, बेटी बचाव कार्यशाळा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, मेळघाट येथील आदिवासी बांधवांना मदत, पर्यावरण जागृती म्हणून १०१ वृक्षांची लागवड, कष्टकरी महिलांचा सत्कार आदी विविध उपक्रमाचे आयोजन या दहा दिवसात करण्यात आले असून दहा दिवस धार्मिक उपक्रम, भजन स्पर्धा, बालकांसाठी चित्रकला स्पर्धा, नृत्यस्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धा, महाप्रसाद आदीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकारी अॅड. भारती निलेश सोमाणी, स्मीता दहात्रे, निता दहात्रे, विमला साबळे, अन्नपूणा बोरकर, मते, खानझोडे, शिवाल, अग्रवाल, लढ्ढा, वनारे, तायडे समवेत मंडळाच्या महिला पदाधिकारी यांनी दिली. मंडळात सर्व महिलांना स्थान देण्यात आले असून युवतींना व बालकांसाठी विशेष प्रबोधन व कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याची माहिती मंडळाचे समन्वयक नीलेश सोमाणी, सुरेश दहात्रे, कैलास दहात्रे यांनी दिली.