वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ
By सुनील काकडे | Published: September 9, 2022 11:17 AM2022-09-09T11:17:27+5:302022-09-09T11:17:36+5:30
आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला.
आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाअभिषेक, मानाच्या राजा जय शिवशंकर गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली.
वाशिम शहराला गणेशोत्स्तवाची मोठी परंपरा लाभलेली आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत लाडक्या बाप्पाना ढोलताशे, डीजेच्या निनादात वाजतगाजत पुढील वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देऊन निरोप दिला जातो. त्यानुसार याहीवर्षी सजलेल्या ट्रकांमध्ये लाडक्या गणेशाला विराजमान करून मिरवणुकीस सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरु झालेली झालेली मिरवणूक बालू चौक, राजनी चौक, माहूरवेस, दंडे चौकमार्गे देवतालावावर पाहोचणार आहे. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात करण्यात आला आहे.