मंगरुळपीर येथे गणेश विसर्जन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:37+5:302021-09-21T04:46:37+5:30

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी गणेश विसर्जन केले. तसेच मिरवणुकीला परवानगी ...

Ganesha immersion in peace at Mangrulpeer | मंगरुळपीर येथे गणेश विसर्जन शांततेत

मंगरुळपीर येथे गणेश विसर्जन शांततेत

Next

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली. कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी गणेश विसर्जन केले. तसेच मिरवणुकीला परवानगी नसल्याने यावर्षी साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आले.

घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी नगरपालिकेच्या वतीने आठ ठिकाणी गणेश विसर्जन रथांची व्यवस्था करण्यात आली होती. नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांचे हस्ते या रथाचे उद्घाटन पालिका आवारात करण्यात आले. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा साधेपणाने गणेश विसर्जन केले. यावेळी स्थानिक बिरबलनाथ मंदिरात मानाचा गणपती असलेल्या बिरबलनाथ गणेश मंडळाच्या मूर्तीचे पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेश संगत व राजेश खंडेतोड यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ठाणेदार धनंजय जगदाळे, दर्गाहचे अध्यक्ष शमशोद्दीन जहागिरदार,बिरबलनाथ संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी,माजी नगराध्यक्ष प्रा विरेंद्रसिंह ठाकूर,रमेशसिंग ठाकूर,कृष्णकुमार रघुवंशी,नगरसेवक उबेद मिर्झा,ओम दुबे, अविष रघुवंशी,योगेश रघुवंशी यांचेसह पत्रकार,नगरपरिषद व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Ganesha immersion in peace at Mangrulpeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.