दुधाची ‘गंगा’ वाहणारे गाव ‘शिरपूर’
By admin | Published: February 28, 2017 04:02 PM2017-02-28T16:02:44+5:302017-02-28T16:02:44+5:30
सद्यस्थितीत गो-धन मोठया प्रमाणात घटत असताना वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे आजही दुधाची गंगा वाहते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन (वाशिम), दि. 28 - सद्यस्थितीत गो-धन आणि त्यापासून मिळणारे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घटत होत असताना वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे आजही दुधाची गंगा वाहते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या गावातील अर्ध्याहून अधिक कुटुंबांकडे गोधन असून त्यापासून मिळणा-या दुधाच्या विक्रीसाठी आजही दुध संकलन केंद्रावर रांगाच-रांगा लागतात.
गावात दुधाची विक्रमी वाढ होण्यासाठी अभिमान उल्हामाले यांचा सिंहांचा वाटा आहे. गावाची 20 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून कुटुंबसंख्या 5 हजार आहे. या 5 हजार कुटुंबापैकी जवळपास 2600 ते 2700 कुटुंबाकडे गोधन असून त्यांचा प्रमुख व्यवसाय शेतीसह पशुपालनाचा आहे.