लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 04:41 PM2019-02-03T16:41:01+5:302019-02-03T16:41:05+5:30
वाशिम: जलसंधारणाच्या कामांसाठी राज्यभरात ओळख निर्माण झालेल्या वाशिम तालुक्यातील साखरा येथे लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा करण्या येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जलसंधारणाच्या कामांसाठी राज्यभरात ओळख निर्माण झालेल्या वाशिम तालुक्यातील साखरा येथे लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा करण्या येत आहे. या कामाला गावकरी व शेतकºयांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने धरणातील गाळाचा वेगाने उपसा होत आहे.
आदर्श साखरा येथे यापूर्वी लोकसहभागातून जलसंधारणाची विविध कामे करून हे गाव पाणीदार करण्यात गावकºयांनी मोठी भूमिका वठविली आहे. या ठिकाणी अडीच किलोमिटर नाल्याचे खोलीकरण झाल्याने गावातील तब्बल २५० हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याने शेतकºयांचे हरितक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचे दिसून येत आहे. १८९ घरांची वस्ती असलेल्या साखरा या गावातील १५० पेक्षा अधिक कुटूंबाचा व्यवसाय हा प्रामुख्याने शेती आहे. गावात सन २०११ पूर्वी दरवर्षी दुष्काळसदृष स्थिती निर्माण व्हायची. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करावी लागायची. दरम्यान, ग्रामस्थांना पाण्याचे महत्व कळाले आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरवून त्याचा उपयोग करण्याचे धोरण आखण्यात आले. त्यानंतर मात्र अख्खे गावच जलसाक्षरतेने झपाटले गेले. याच गावात गत १५ दिवसांपूर्वी ग्रामस्थ व शेतकºयांच्या सहकायार्ने लोकसहभागातून नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर आता येथील गावकºयांनी २९ जानेवारीपासून लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. धरणातील गाळ उपशासाठी शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. धरणातून उपसण्यात आलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात टाकत आहेत. त्यामुळे धरणाची खोली वाढून साठवण क्षमतेत वाढ होणार आहेच शिवाय शेतात गाळ टाकल्याने जमीन कसदार होऊन शेतकºयांना दुहेरी लाभ या कामाचा मिळणार आहे. या कामासाठी शेतकरी तथा शिक्षक गजाननराव राऊत, जलमित्र तथा शिक्षणतज्ज्ञ सुखदेव आत्माराम इंगळे रामराव इंगळे, विठ्ठल आघम, महादेव राऊत, विठ्ठल इंगळे, गणेश महाले, सतीश इंगळे, गजानन इंगळे आदि गावकरी व शेतकरी परिश्रम घेत आहेत.