कासोळा येथे गॅस सिलिंडरचा स्फोट
By admin | Published: October 17, 2015 01:53 AM2015-10-17T01:53:21+5:302015-10-17T01:53:21+5:30
दोन लाखांचे नुकसान; महिला बेघर.
मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील ग्राम कासोळा येथे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास बेबी ज्ञानेश्वर भगत (४५) या महिलेच्या घरा तील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक झाले. या घटनेमध्ये २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील कासोळा येथील बेबी ज्ञानेश्वर भगत ही महिला शेतातून घरी आल्यावर गॅसवर चहा ठेवून घराबाहेर पडली असता अचानक गॅस सिलिंडरचा स् पोट झाला. त्यानंतर घराला आग लागली. संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. आग लागताच अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले होते; परंतु त्यापुर्वी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत घरातील नगदी ३ हजार २00 रुपये, टिन पत्रे, धान्य जीवनावश्यक वस्तू आदी घरातील साहित्य आगीमुळे जळाले. आगीत घर जळाल्याने महिला बेघर झाली आहे. घटनेनंतर नायब तहसीलदार पी.झेड. भोसले, मंडळ अधिकारी डी.डी. जाधव, तलाठी भुसारी यांनी तत्काळ घटनास् थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेची माहिती आसेगाव पोलिसांना मिळताच त्यांचा ताफा कासोळा येथे दाखल झाला.