कामरगाव व परिसरात गॅसधारकांची शेगडी, सिलिंडर तपासणीच्या नावाखाली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:03 PM2018-02-06T13:03:15+5:302018-02-06T13:04:27+5:30

कामरगाव :  कामरगाव व परिसरात एका गॅस कंपनी व  वितरकाच्यावतीने दोन वर्षाअगोदरच्या गॅसधारकांच्या शेगडी व सिलिंडरची तपासणी करण्यात येत आहे.

gas cylinder inspection in washim district |   कामरगाव व परिसरात गॅसधारकांची शेगडी, सिलिंडर तपासणीच्या नावाखाली लूट

  कामरगाव व परिसरात गॅसधारकांची शेगडी, सिलिंडर तपासणीच्या नावाखाली लूट

googlenewsNext
ठळक मुद्देगॅस सिलिंडर व शेगडीमधील दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी काही मुलांची नेमणुक करुन तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. नेमणुक केल्याची गावात तपासणीची  महिती संबंधीत गावातील ग्रामपंचायत व पोलिस विभागाला देणे गरजेचे आहे. परंतु याबाबत या दोन्ही विभागाला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही.

कामरगाव :  कामरगाव व परिसरात एका गॅस कंपनी व  वितरकाच्यावतीने दोन वर्षाअगोदरच्या गॅसधारकांच्या शेगडी व सिलिंडरची तपासणी करण्यात येत आहे. अव्वाच्या सव्वा फी आकारुन ग्राहकांची लूट केल्या जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून केल्या जात आहेत. गॅस सिलिंडर व शेगडीमधील दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी काही मुलांची नेमणुक करुन तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. यासाठी ग्राहकांकडून १५० रुपये फि आकारण्यात येत आहे. पंरतु याची नेमणुक केल्याची गावात तपासणीची  महिती संबंधीत गावातील ग्रामपंचायत व पोलिस विभागाला देणे गरजेचे आहे. परंतु याबाबत या दोन्ही विभागाला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही. नेमणूक करण्यात आलेली मुले गॅसधारकांना विशेष महिलांना तपासणी  न केल्यास गॅस सबसिडी बंद होईल, सिलेंडर भरुन मिळणार नाही अशी बतावणी करतांना दिसून येत आहेत. एकप्रकारे  जबरदस्तीने तपासणी फि वसुल करत असल्याचा प्रकार कामरगावात  घडत असल्याचे चित्र आहे. कंपनी व वितरक यांची मिलीभगत धोरणामुळे  गॅसधारकांना लाखो रुपये वसुल करत असल्यामुळे तपासणीच्या नावाखाली लुट करीत असल्याची गॅसधारक ओरड करीत आहेत. याबाबत पुरवठा विभाग कारंजा यांच्याशी संपर्क होवु शकला नाही.

Web Title: gas cylinder inspection in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम