१० विहीरीचे पाणी जमा करुन केली पाणी टंचाईवर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:32 PM2018-05-25T13:32:40+5:302018-05-25T13:32:40+5:30

गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळील पाईप जमा करुन श्रमदानाने गावाबाहेरील इतर शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी एका विहीरीत टाकण्याचे ठरविले.

Gather 10 wells water and overcome water scarcity! | १० विहीरीचे पाणी जमा करुन केली पाणी टंचाईवर मात!

१० विहीरीचे पाणी जमा करुन केली पाणी टंचाईवर मात!

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांजवळील १०० पाईप जमा करुन दररोज दोन तीन विहीरीचे पाणी संकलन करुन ते पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत सोडुन तेथुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरु केला . यासाठी सरपंच दिपक खडसे, पाणी पुरवठा कर्मचारी बबन राजाराम ठाकरे, बन्सीराम ठाकरे, प्रकाश काळे यांच्यासह गावकºयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्वत: ४१ डिग्री सेल्सीअस तापमानात स्वत:च्या अंगावर घेणाºया गावकºयांसह सरपंचाचे कौतूक केल्या जात आहे.

वाशिम : गावातील ग्रामीण पाणी पुरवठ्याचा पाण्याचा स्त्रोत आटल्याने खरोळा गाव भिषण पाणी टंचाईच्या गर्तेत सापडलेले असतांना गावाला पाणी टंचाई जाणवु देणार नाही या उद्देशाने खरोळा सरपंच दिपक खडसे यांनी सचिव विजय ठाकरे व सर्व ग्रा.पं.सदस्यांची भेट घेवुन चर्चा केली व १० विहिरींचे पाणी जमा करुन त्यावर मात मिळविली. संपूर्ण जिल्हयात त्यांच्या कार्याचे कौतूक होत आहे.
गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांजवळील पाईप जमा करुन श्रमदानाने गावाबाहेरील इतर शेतकऱ्यांच्या विहीरीचे पाणी एका विहीरीत टाकण्याचे ठरविले , परंतु यातही अनेक अडचणीला सामोर जावे लागले असतांना धिर न सोडता सरपंचांनी सर्व ग्रा.पं.पदाधिकारी घेवुन गावातील कांताबाई काळे, मिरु ठाकरे, महादेव हरिभाऊ ठाकरे, शिवाजी महाले, गजानन ठोंबे, विठ्ठल लाडके, संजय ठाकरे, श्रीराम ठाकरे, नंदु ठाकरे,वसंता महाले या सर्व शेतकºयांची भेट घेतली. गावावर असलेले पाणी संकटाची माहिती त्यांना दिली. यावरुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या विहीरीचे पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी मोफत देण्याचे मान्य केले. यावरुन त्यांनी गावातील शेतकऱ्यांजवळील १०० पाईप जमा करुन दररोज दोन तीन विहीरीचे पाणी संकलन करुन ते पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीत सोडुन तेथुन गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरु केला . पाईप अपुरे पडत असल्याने पाईपाची दररोज उचलखाचल करुन दुसºया विहीरीवर टाकण्याचे काम सुध्दा गावकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरु केले. हे करीत असतांना अतिशय त्रास सुध्दा सहन करावा लागला मात्र कोणीही माघार घेतली नाही. यासाठी सरपंच दिपक खडसे, पाणी पुरवठा कर्मचारी बबन राजाराम ठाकरे, बन्सीराम ठाकरे, प्रकाश काळे यांच्यासह गावकºयांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. नागरीकांच्या पाणी टंचाईच्या झळा स्वत: ४१ डिग्री सेल्सीअस तापमानात स्वत:च्या अंगावर घेणाºया गावकºयांसह सरपंचाचे कौतूक केल्या जात आहे.
 

Web Title: Gather 10 wells water and overcome water scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.