भूगोल दिनानिमित्त जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 03:41 PM2019-01-15T15:41:30+5:302019-01-15T15:42:14+5:30
वाशिम : राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतीने पर्यावरणाच्या दृष्टिने व समाजामध्ये भूगोलविषयी आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने १४ जानेवारी रोजी रॅली काढून जनजागृती करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्यावतीने पर्यावरणाच्या दृष्टिने व समाजामध्ये भूगोलविषयी आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने १४ जानेवारी रोजी रॅली काढून जनजागृती करण्यात आली .या मध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १४ जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणुन शाळेच्यावतीने साजरा करण्यात आला . २२ डिसेंबरला सुर्याचे उत्तरायण सुरु होऊन संक्रमण कालावधी सुरू होतो. हा संक्रमण कालावधी भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा असल्याने १४ जानेवारी रोजी भूगोल दिन साजरा केला जातो . तसेज भुगोलाचे महर्षि डॉ सी.डी.देशपांडे यांचा जन्मदिन म्हणुनही हा दिन साजरा केला जातो. याबाबत जनतेमध्ये जनजागृती व माहिती व्हावी म्हणुन राष्ट्रीय हरीतसेना एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीम व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचार फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीना उबगडे होत्या . त्यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर प्रचार रॅलीस सुरवात करण्यात आली. यावेळी सहभागी विद्यार्थींनी विविध घोषवाक्यातुन पर्यावरणाच्या दृष्टिने भूगोलाचे महत्व लोकांना पटवुन दिले. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले .
प्रचार रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक संदिप बोदडे व सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक यु.म.फड तसेच राष्ट्रीय हरीत सेनेच्या चिमुकल्यांनी मोलाचे सहकार्य केले.