वाशिम जिल्ह्यात उडिद पिकावर गेरवा सदृष रोगाचा प्रादूर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:24 PM2018-07-10T14:24:14+5:302018-07-10T14:25:28+5:30
वाशिम: जिल्ह्यात खरीप हंगामातील उडिदाच्या पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून, येत त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात खरीप हंगामातील उडिदाच्या पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून, येत त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तात्काळ बुरशीनाशक फवारणी करून या रोगावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी जवळपास पूर्ण झाली असून, जुनच्या सुरुवातीला झालेल्या पेरणीची पिके चांगली तरारली आहेत. ही पिके जोम धरू लागली असतानाच या पिकांवर किडींचा प्रकोप सुरू झाल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रामुख्याने उडिद पिकावर गेरवा सदृष बुरशीजन्य रोगाचा आणि सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसत आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाकडून विविध तालुकास्तरावर करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान या रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला आहे. गेरवा सदृश बुरशीजन्य रोगामुळे पिक उत्पादनात घट येण्याची भिती आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेरवा सदृषी बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार तात्काळ किटकनाशक फवारणी करावी, तसेच सोयाबीनवरील हिरव्या उंटअळीच्या नियंत्रणााठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सद्यस्थितीत उडीत पिकावर गेरवा सदृश्य बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यावर नियंत्रणासाठी तात्काळ बुरशीनाश फवारणी करून प्रबंध करावा तसेच सोयाबीन पिकावर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यावर नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी शेतकºयांनी करावी. बुरशीनाशक किटक नाशक विकत घेताना तज्ञांचा सल्ला घेऊन खरेदी करावे व शिफारशीनुसार फवारणी करावी. शेतकºयांना यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास कृषी विभागाकडे संपर्क केल्यास मार्गदर्शन केल्या जाउ शकते. शेतकºयांनी रोगाचा प्रादूर्भाव झाल्याबरोबर कृषी विभागाशी संपर्क करुन कीडीपासून आपली पीके वाचवावी.
-जयप्रकाश लव्हाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (वाशिम)