प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:07 AM2017-08-24T01:07:15+5:302017-08-24T01:08:11+5:30

वाशिम : गत पाच महिन्यांपासून वाशिम जिल्हय़ातील जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव  प्रलंबित आहेत. या मुद्याला हात घालत आमदार राजेंद्र पाटणी यांनी  राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. येत्या आठवड्यात प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची ग्वाही समाजकल्याण मंत्र्यांनी दिल्यानंतर इकडे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याला गती मिळाली. 

Get verified caste verification certificate! | प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार!

प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार!

Next
ठळक मुद्देचर्चेनंतर आली गती आमदार पाटणी यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत पाच महिन्यांपासून वाशिम जिल्हय़ातील जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव  प्रलंबित आहेत. या मुद्याला हात घालत आमदार राजेंद्र पाटणी यांनी  राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी मंगळवारी मंत्रालयात चर्चा केली. येत्या आठवड्यात प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची ग्वाही समाजकल्याण मंत्र्यांनी दिल्यानंतर इकडे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याला गती मिळाली. 
समितीचे अध्यक्ष वाशिम येथे नियमित येत नसल्याने जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना वारंवार चकरा मारूनही जातपडताळणी समितीकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जाते. यासंदर्भात काही पालकांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडे व्यथा मांडल्या. पाटणी यांनी २२ ऑगस्ट रोजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे सदर विषयावर बैठक बोलावून चर्चा घडवून आणली. वाशिम येथे जात पडताळणीचे हजारो प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे धूळ खात पडल्याची बाब मंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. सदर प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी लावून धरली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचीसुद्धा उपस्थिती होती. येत्या आठवड्यात प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याचे निर्देश बडोले यांनी समाजकल्याणच्या अधिकार्‍यांना दिले. या बैठकीनंतर वाशिम जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाने प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र निकाली काढण्याच्या दृष्टिने कामकाजाला गती दिल्याचे बुधवारी दिसून आले. समाजकल्याण विभागाच्या सूचना जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. जिल्हय़ातील ज्या विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र प्रलंबित असतील त्यांनी येत्या आठवड्यात संबंधित विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. 

Web Title: Get verified caste verification certificate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.