घरकुल लाभार्थींसाठी तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 04:12 PM2021-01-31T16:12:06+5:302021-01-31T16:12:14+5:30

Washim News वाशिम तालुक्यात शनिवारी सुपखेला येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

'Gharkul Mart' at taluka level for Gharkul beneficiaries | घरकुल लाभार्थींसाठी तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ 

घरकुल लाभार्थींसाठी तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ 

Next

वाशिम : घरकुल बांधकामविषयक सर्व साहित्य योग्य दरात मिळावे याकरीता जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून बचत गटाच्या मार्फत जिल्ह्यातील सहाही तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट‘ची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. वाशिम तालुक्यात शनिवारी सुपखेला येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
घरकुल बांधकामांना गती देणे, अपूर्ण घरकुल बांधकामे पूर्ण करणे, घरकुलासाठी अतिक्रमित जागा नियमानुकूल करणे आदी उद्देशातून महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. घरकुल लाभार्थींना बांधकामविषयक साहित्य योग्य दरात एकाच ठिकाणी मिळावे याकरीता जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान यांच्या संयुक्त पुढाकारातून प्रत्येक तालुकास्तरावर ‘घरकुल मार्ट’ची सुविधा उपलब्ध केली जात आहे. महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे. वाशिम तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद अभियानांतर्गत कार्यरत प्रगती ग्रामसंघ सुपखेला (ता.वाशिम) यांनी कार्यरत केलेल्या घरकुल मार्टचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिनाक्षी पट्टेबहादूर, पंचायत समिती सभापती गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखडे, गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर खुजे, सरपंच विनोद पट्टेबहादूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: 'Gharkul Mart' at taluka level for Gharkul beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.