घरकुल योजनेत ‘आठ अ’चा अडथळा; अनेक लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:45 PM2018-03-03T16:45:56+5:302018-03-03T16:45:56+5:30
वाशिम- विविध प्रकारच्या घरकुल योजनेत जागेच्या आठ अ चा अडथळा ठरत आहे. घरकुलापासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून जागेचा आठ अ देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी शनिवारी निवेदनाद्वारे केली.
वाशिम- विविध प्रकारच्या घरकुल योजनेत जागेच्या आठ अ चा अडथळा ठरत आहे. घरकुलापासून लाभार्थी वंचित राहू नये म्हणून जागेचा आठ अ देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा नारायण आरू यांनी शनिवारी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली.
प्रधानमंत्री, रमाई, इंदिरा आवास अशा विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना घराचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते. यासाठी लाभार्थीकडे हक्काची जागा आवश्यक आहे. ग्रामीण भागातील काही कुटुंबांकडे हक्काची जागा नाही. मात्र, ते गत काही वर्षांपासून शासकीय जागेवर झोपडीवजा घरात राहत आहेत. शासन नियमानुसार सदर अतिक्रमण नियमाकूल करण्यात यावे आणि अशा बेघरांना जागेचा आठ अ देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शारदा आरू यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली. रिठद सर्कलसह वाशिम जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी जागेचा नमुना आठ अ आवश्यक आहे. काही कुटुंबांकडे जागेचा आठ अ नाही. मात्र ते शासनाच्या इ क्लास जमिनीवर निवारा करून राहत आहेत. जागेचा आठ अ नमुना नसल्याने या लाभार्थींना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. जागा खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्यदेखील देण्यात येते. मात्र, या योजनेचा प्रसार-प्रचार नसल्याने लाभार्थींना वंचित राहावे लागत आहे. कित्येक वर्षांपासून इ-क्लास जागेवर राहणाºया लाभार्थींना शासन नियमानुसार अतिक्रमण नियमाकुल होणे अपेक्षीत होते. यासंदर्भात लाभार्थींनी तहसिल कार्यालयामार्फत प्रस्तावही सादर केले आहेत. या प्रस्तावाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जागेचा आठ अ नमुना देण्यात यावा अशी मागणी आरू यांनी केली. निवेदनाच्या प्रतिलिपी खासदार भावना गवळी, पालकमंत्री संजय राठोड यांना देण्यात आल्या.