मुलींचे प्रमाण घटले!
By admin | Published: July 17, 2015 01:59 AM2015-07-17T01:59:34+5:302015-07-17T01:59:34+5:30
लिंग गुणोत्तरात घट; हजार पुरुषांमागे ९३५ महिला.
वाशिम : वंशाचा दिवा म्हणून मुलालाच पहिली पसंती दिली जात असल्याची बाब आरोग्य विभागाच्या आकडेवारीने अधोरेखीत केली आहे. वाशिम जिल्हय़ात २0१४ मध्ये एक हजार पुरुषांमागे ९६२ स्त्री असे लिंगगुणोत्तर प्रमाण २0१५ च्या सहामाहित ९३५ पर्यंंत चिंताजनक अशा पातळीवर येऊन ठेपले आहे. ह्यमुलांपेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करीह्ण ही पुस्तकातील म्हण आजमितीला केवळ वाचण्यापुरतीच र्मयादित झाल्याचे आकडेवारीने स्पष्ट केले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची घटती संख्या हा विषय दिवसेंदिवस भीषण आणि तेवढाच चिंतनशील बनत चालला आहे. समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान असल्यामुळे कित्येक पालक बालिकेचा जन्म होऊ देणे टाळतात. साधारणत: चार-पाच वर्षांंंपूर्वी मुलींना गर्भातच नख लावण्याच्या पापाचे धनी अनेकजण बनत होते. आता गर्भलिंग निदान चाचणीवर निर्बंंध आल्याने उघड होणार्या चाचण्या चोरी-छुपे होतात. साहजिकच पूर्वीच्या तुलनेत स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर काही प्रमाणात वाढले आहे. २0१४ या वर्षात जिल्ह्यात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराचा आकडा ९६५ असा समाधानकारक होता. २0१५ च्या सहामाहीत यामध्ये कमालीची घट आली आहे. जानेवारी ते जून २0१५ या कालावधीत लिंग गुणोत्तराचा आकडा ९३५ पर्यंंंत खाली आला आहे. २0१५ मध्ये मानोरा शहरी ब्लॉकमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. १000 पुरुषांमागे १0६५ स्त्री असे प्रमाण मानोरा ब्लॉकमध्ये आहे. २0१४ मध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर वाशिम शहरी भागात होते. १000 पुरुषांमागे १0४६ स्त्री असे प्रमाण वाशिम ब्लॉकमध्ये होते. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मालेगाव शहरी भागात आहे.