युवतींनी पोलिसांना राख्या बांधून केले ¬णानुबंध घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:13 AM2017-08-09T02:13:45+5:302017-08-09T02:14:09+5:30

मंगरुळपीर: नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून मंगरूळपीर शहरातील सतत शहराच्या हिताचा विचार करत असलेल्या यंग सिटीझन टीम ऑफ मंगरुळपिर यातील युवतींनी दि.८ऑगष्ट रोजी शहरातील जनतेच्या हितासाठी सतत स्वत:च्या जीवाचे रान करणा?्या पोलीस बांधवाना राखी बांधून त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या आपुलकीच्या नात्याला एक नवीन वळण दिले आहे. 

The girls tied the knot to the police | युवतींनी पोलिसांना राख्या बांधून केले ¬णानुबंध घट्ट

युवतींनी पोलिसांना राख्या बांधून केले ¬णानुबंध घट्ट

Next
ठळक मुद्दे‘यंग सिटिझन टीम’चा पुढाकाररक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क 
मंगरुळपीर: नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून मंगरूळपीर शहरातील सतत शहराच्या हिताचा विचार करत असलेल्या यंग सिटीझन टीम ऑफ मंगरुळपिर यातील युवतींनी दि.८ऑगष्ट रोजी शहरातील जनतेच्या हितासाठी सतत स्वत:च्या जीवाचे रान करणा?्या पोलीस बांधवाना राखी बांधून त्यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या आपुलकीच्या नात्याला एक नवीन वळण दिले आहे. 
कुठलाही सणउत्सव असला तरी पोलीस कर्मचारी जनतेच्या  संरक्षणासाठी कर्तव्यावर असल्यामुळे त्यांना आपल्या कुटूंबांसोबत घरी सण साजरा करता येत नाही. याची जाण यंग सिटीझन टीमने ठेवत त्यांनी रक्षाबंधन सारख्या पावन पर्वावर मंगरुळपीर पोलीस स्टेशनमधील उपस्थित सर्व कर्मचार्‍यांना युवतींच्या हस्ते राखी बांधल्या आणि  पोलीस कर्मचार्‍यांच्या प्रति आपुलकीची भावना व्यक्त केली. या नाविन्य अशा उपक्रमात ‘यंग सिटीझन टीम’च्या पूनम चौधरी, काजल राजोदीया, रक्षा शर्मा, संजना मुंदडा, मानसी अंकुशकंन, कामाक्षी कटोरे , वैष्णवी ठाकरे, प्रगती भाकरे आदींनी सहभाग घेऊन आपल्या पोलीस भावास रक्षाबंधन केले. मंगरुळपीर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जायभाये  यांनी ‘यंग सिटीझन टीम’च्या उपक्रमाचे कौतूक करतानाच जनतेबद्दल त्यांचे असलेले मत स्पष्ट करून  पोलीस बांधवाना तुमचे भाऊ समाजा, असे आवाहन सर्व युवतींना केले. तसेच पोलिसांपासून घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगत आम्ही सज्जनांची सदैव मदत करतो व वाईट लोकांनाच कायद्याची भाषा शिकवितो,  हे देखील स्पष्टपणे सांगितले. पुढे काहीही मदत लागल्यास निसंकोच मानाने तुमचा या पोलीस दादांना सांगा असे आवाहन युवतींना केले . पुढील कार्यास कधीही तुम्हाला आमची मदत लागल्यास आपल्याला सांगा असे सर्व  ‘यंग सिटीझन टीम’ ला सांगत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाला नाना देवळे, फुलचंद भगत, सुधाकर चौधरी आदींनी आपली उपस्थिती दर्शवली, तसेच फुलचंद भगत यांनी अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्या कार्याबद्दलही सवार्ना सांगितले.  या उपक्रमात यंग सिटीझन टीम चे अध्यक्ष सूचित देशमुख , अतुल खोपडे, अनुप इंगळे , मयूर पाटील , कारण मुंढरे,  सोमनाथ परंडे, आकाश चौधरी, श्रीकांत महल्ले, पुरूषोत्तम शर्मा, समरजीत रघुवंशी, दीपक खांबालकर, अमेय देशमुख, प्रवीण चौधरी, इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Web Title: The girls tied the knot to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.