शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार मदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:27 AM2017-09-07T01:27:12+5:302017-09-07T01:27:20+5:30

कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली.

Give 30,000 farmers a hectare! | शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार मदत द्या!

शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार मदत द्या!

Next
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी तहसीलदारांसोबत पदाधिकार्‍यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क 
कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील मोहेंबर महिन्यात केलेल्या नोटाबंदीचा सर्वात जास्त नुकसान शेतकर्‍यांचेच झालेले आहे. या नोटबंदीमुळे शेतकर्‍यांना आपला माल व्यापार्‍यांना कवडीमोल भावाने विकावा लागला. ज्यावेळी शासनाने शेतकर्‍या जवळची तूर व सोयाबीन हमीभावाने विकत घेण्याचे जाहिर केले त्यावेळपर्यंत शेतकर्‍यांचा पंचाहत्तर टक्के माल कवडीमोल भावाने व्यापार्‍यांना विकून झाला होता. तोच माल व्यापार्‍यांनी नाफेडला हमीभावाने विकला. 
खरीप हंगामाची सुरुवात झाली. बँकेनी शेतकर्‍यांना कर्ज दिले नाही म्हणून काही शेतकर्‍यांनी आपल्या घरातील दागीने मोडून तर काहीनी सावकाराकडून प् कर्ज काढून कशीतरी पेरणी केली, अत्यल्प पावसामूळे काही शेतकर्‍यांना दुबार तिबार पेरनी करावी लागली. त्यानंतरही दीड महिन्यापर्यन्त पाऊस न आल्याने शेतकर्‍्यांना निसगार्चा कोप सहन करावा लागला. या शेतक यांच्या संकटकाळात शासनाने शेतकर्‍यांना शेतातील कामे सोडून पत्नीसह लहान मूलाबाळांना घेवून कर्जमाफीचा फॉर्म भरण्याकरिता सेतू केन्द्रावर पाठवून खाईत लोटल्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा अस्मानी संकटाचा सामना करीत शेतकरी हतबल झालेला आहे असया सर्व घडामोडीमूळे शेतकरी कुटुबाला नैराश्याचे जिवन जगण्याची पाळी शासनाने आणून ठेवली आहे. हे टाळण्याकरिता शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तिस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देतांना उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड, शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य डॉ सुभाष राठोड, तालुकाप्रमुख नरहरी कडू, शहरप्रमुख गणेश बाबरे, उपतालुका प्रमुख बबन हळदे, जगदिश थे र, संदिप राठोड, गणेश गांजरे, सरपंच बाबाराव पाटील गुंजाटे,उपशहर प्रमुख कन्हैया ठाकूर, सर्कल प्रमुख गजानन बनारसे, विजय जमाले, विनोद घाटगे, शाम भगत, अमोल उगले, कैलास उपाध्ये, शंकर नेमाडे, विभागप्रमुख घनश्याम जयराज,पवन गुल्हाने, अभिजीत मांडवगडे, संजय जाधव, सुनिल बोबडे, जितेंद्र बोबडे इत्यादी शिवसेनेच्या पदाधीका?्यांसह काही शेतकरी उपस्थित होते. 

Web Title: Give 30,000 farmers a hectare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.