यंदा सोयाबीनसाठी एक हजार बोनस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:29 PM2017-10-27T14:29:19+5:302017-10-27T14:31:30+5:30
शासनाने यंदा सोयाबीनसाठी अतिरिक्त एक हजार रुपये बोनस द्यावा, तसेच जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचया हमीभावातही वाढ करावी, यासाठी वाशिम बाजार समितीच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविले आहे.
वाशिम: यंदा अपुºया पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली असतानाच या शेतमालास बाजारात हमीभावापेक्षा खूपच कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शासनाने यंदा सोयाबीनसाठी अतिरिक्त एक हजार रुपये बोनस द्यावा, तसेच जाहीर केलेल्या ३ हजार ५० रुपये प्रति क्विंटलचया हमीभावातही वाढ करावी, यासाठी वाशिम बाजार समितीच्या संचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठविले आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना सोयाबीन उत्पादक शेतकºयांची व्यथाच आपल्या पत्रातून कळविली आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, यंदा अपुºया पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन घटलेच शिवाय परतीच्या पावसाने फ टका दिल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यातच शेतकरी रब्बीच्या तयारीसाठी बाजारात सोयाबीन विकण्याची घाई करीत असताना या शेतमालाची हमीभावापेक्षा खूप कमीभावाने खरेदी करण्यात येत आहे. शासनाने नाफेडमार्फत अद्याप सोयाबीनची खरेदी सुरू केली नसल्याने शेतकºयांची बाजारात लुट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालत शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच नाफेडची खरेदी सुरू करण्यापूर्वी साठवणुकीची सोय, बारदाण्याचे नियोजन करावे, प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञ ग्रेडर नियुक्त करावा, जेणेकरून या खरेदीत अडथळे येणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.